Posts

Showing posts from October, 2024

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना रोटरी संस्थेतर्फे दिवाळी गिफ्ट

Image
प्रतिनिधी श्रावणी कामत रोटरी ही एक सामाजिक संस्था असून रोटरी संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्न करत असतात. यामध्ये शाळा दत्तक घेणे, डिजिटल स्कूल, ई लर्निंग किट, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, वर्गातील बेंचेस, फर्निचर, वह्या पुस्तके यासारखे उपक्रम वर्षभर राबवीत असतात. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून रोटरी क्लब ऑफ निगडी चे अध्यक्ष श्री. सुहास ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲप मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.  शालेय विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्ष हे आयुष्याला वळण देणारे वर्ष असल्याने पालक व शिक्षक यांची देखील मुलांकडून उत्तम गुणांची अपेक्षा असते. दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सहज सोप्या भाषेत समजून घेता यावा व अभ्यासात तज्ञ शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी रोटरी क्लब ऑफ निगडी यांनी गुणवत्ता पूर्ण व दर्जेदार असणारे आयडियल स्टडी ॲप 2000 विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले आहे. य...

छाननी प्रक्रियेत १२ उमेदवार बाद; निवडणूक आखाड्यात उरले ९९!

Image
तिन्ही मतदारसंघांमध्ये 'टफ फाइट'चे संकेत!जिल्ह्यातील वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे श्याम खोडे आणि उद्भवसेनेचे डॉ. सिद्धार्थ देवळे, कारंजात भाजपच्या सई डहाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्ञायक पाटणी यांच्यात थेट लढत होणार असून दोन्ही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसह अन्य राजकीय पक्ष व काही अपक्षांनी मोठे आव्हान उभे केल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रिसोड मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमीत झनक, शिंदेसेनेच्या भावना गवळी आणि अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख अशी तिहेरी लढत होण्याचे संकेत वाशिम : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर या अंतिम मुदतीपर्यंत १११ उमेदवारांकडून १३६ अर्ज दाखल करण्यात आले होते. ३० ऑक्टोबरला छाननी प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात १२ उमेदवारांच्या अर्जात त्रुटी निघाल्याने त्यांना बाद ठरविण्यात आले असून, आता निवडणुकीच्या मैदानात ९९ उमेदवार उरले आहेत. ४ नोव्हेंबरपर्यंत नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यात किती जण माघार घेतात आणि प्रत्यक्ष किती उमेदवार रिंगणात शिल्लक राहतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. जिल्ह...

मावळमधील एकाधिकारशाही, हिटलरशाही मोडून काढा

Image
  रामदास काकडे यांचा सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत आमदार शेळकेंवर घणाघात प्रतिनिधी श्रावणी कामत  तळेगाव दाभाडे :  आमदार सुनील शेळके यांनी कोणत्या हेतूने 'गावगुंड' हा शब्द वापरला, हे त्यांनाच माहीत. मुळात आमदार शेळके हेच मावळची संस्कृती मोडीत काढण्याचे काम करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे यांनी केली.              आमदार सुनील शेळके यांनी धमकीचा एक कॉल मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दाखवला. त्याचा खुलासा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, निवृत्ती शेटे, भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, संतोष कुंभार, सचिन घोटकुले, बाळासाहेब घोटकुले, दत्तात्रय माळी, बाबुलाल गराडे आदी उपस्थित होते.       ...

शहापूर येथील कानविंदे पाड्यात युवाच्या माध्यमातून दिवाळी साजरी

Image
प्रतिनिधी श्रावणी कामत. आज रविवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी,  शहापूर तालुक्यातील कानविंदे या आदिवासी पाड्यातील शालेय विद्यार्थ्यांसोबत व पालकांसोबत युवा साहित्य प्रतिष्ठान तर्फे दिवाळी निमित्त फराळ व साडी वाटप करण्यात आले     कर्तव्य म्हटलं की जबाबदारी आली आणि जबाबदारी म्हटली की युवा साहित्य प्रतिष्ठान नेहमीच तत्पर असतं. ज्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हा तान्हात मोल मजुरी करावी लागते अशा दुर्गम भागात युवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात, या उपक्रमात तळेगाव येथील ऍड. धनंजय कोद्रे यांच्या कडून तेथील स्त्रियांना साडी वाटप करण्यात आली तसेच लोणावळ्यातून मुलांना फटाक्यांचे वाटप सुद्धा करण्यात आले. याप्रसंगी केंद्र प्रमुख महेंद्र धिमते सर, ऍड. धनंजय कोद्रे सर, श्रिया रहाळकर, आशिष जांगीर , युवाचे कार्यकर्ते संतोष खरटमोल, श्रावणी कामत, गजानन परब, प्रियंका वाघुले-साबळे, ओमकार देसाई, आनंद रांजणे, कृतिका शेळके, सायेश साबळे, श्रध्दा क्लासेसचे विद्यार्थी कु.ऋतूजा पाटील, कु.सुजल पाटणकर, कु.रोशन कांबळे आदी उपस्थित होते. ...

अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी दाखल केला लाखोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज

Image
मावळातील बेरोजगारी, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी निवडून देण्याचे सर्वपक्षीय नेत्यांचे मावळवासियांना आवाहन  तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी : श्रावणी कामत  मावळ विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सोमवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), मनसे, आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, आयोजित जाहीर सभेत मावळातील बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी बापूसाहेब भेगडे यांना निवडून देण्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी मावळवासियांना आवाहन केले.           मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास काकडे, मनसेचे ...

महायुती एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाणार - खा. श्रीरंग बारणे

Image
जगताप, बनसोडे सोमवारी अर्ज भरणार तर महेश लांडगे मंगळवारी अर्ज भरणार प्रतिनिधी श्रावणी कामत पिंपरी, पुणे (दि. २७ ऑक्टोबर २०२४) राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. त्यामुळे विकासात्मक मुद्दे घेऊन विधानसभा निवडणुकीला महायुती एकजुटीने सामोरे जात आहे. जनता महायुतीच्या मागे आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी मेट्रो, पाणी, रस्ते असे अनेक प्रश्न महायुतीने मिटवले आहेत. आम्ही सर्वजण एकत्र असून एकदिलाने निवडणुका लढून जिंकणार असल्याचा निर्धार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.     महायुती व इतर घटक पक्ष यांच्या वतीने  रविवारी चिंचवड विधानसभेचे उमेदवार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, पिंपरी विधानसभेचे उमेदवार, आमदार अण्णा बनसोडे आणि भोसरी विधानसभेचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांचे प्रतिनिधी कार्तिक लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेश बहल, आमदार अश्विनीताई जगताप, उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माज...

गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत सेमिनार संपन्नमंगरूळपीर-

Image
स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत अभ्यासक्रमावर आधारित विविध विषयांवर विद्यार्थिनींनी  द्वारे सेमिनार प्रेसेंटेशन दिनांक 21ऑक्टोंबर ते 26 ऑक्टोबर 2024 या कालावधीत केले.                   गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ समन्वयक प्रा. सौ .सुषमा जाजु, अध्यक्ष प्रा. एन.पी .पडवाल राज्यशास्त्र विभाग प्रमुख  हे उपस्थित होते. समन्वयक प्रा. सुषमा जाजू यांनी विद्यार्थिनींमध्ये असलेल्या अध्यापन कौशल्याला वाव देण्याकरिता तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ,नवीन तंत्रज्ञानाचे महत्त्व ही जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महाविद्यालयांमध्ये राबविले जातात असे मत प्रतिपादन केले. तसेच अध्यक्ष प्रा. पडवाल  यांनी सेमिनार प्रेझेंटेशन चे काही टिप्स विद्यार्थ्यांना सांगितले व त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता अशा प्रकारचे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबविले जाते, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास ,संवाद कौशल्य ,भाषा कौशल्य निर्माण होण्यास मदत ...

मुलीच्या वाढदिवसानिमित्य गरीब कुटुंबातील मुलांना कपडे आणी फराळाचे वाटप

Image
मंगरुळपीर:-मंगरुळपीर येथील सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांच्या वाय सी प्री प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये के.जी.-२ मध्ये शिकत असलेली कु.स्वरा या मुलीच्या वाढदिवसानिमित्य पाल ठोकुन राहत असलेल्या आणी दगडाचे काम करीत असलेल्या गरीब पाथरवट समाजातील लहान मुलांना नविन कपडे,दिवाळीचा फराळ तसेच त्यांच्या आईवडीलांना साडीचोळी व शेलाटोपी देवुन समाजात नवा आदर्श निर्माण करुन चिमुकल्यांच्या मनात लहानपणापासुनच समाजसेवेची जाण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.लहान मुलांना कनविन कपडे आणी फराळ मिळाल्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडुन वाहत होता.                 आयुष्यात आनंद, सौख्य, प्रेमाची बरसात करणारा सण अर्थात दिवाळी. फटाक्‍यांची आतषबाजी, फराळाचा आस्वाद, रांगोळीचा सडा, लक्ष दिव्यांनी उजळून निघणारा आसमंत. आनंद, प्रेम आणि सुखाची उधळण करीत येणारा दीपोत्सव नातेवाईक, मित्र-मैत्रिणी व कुटुंबातील ऋणानुबंधाची वीण घट्ट करतो. गरीब, निराधार आहेत, ज्यांना दिवाळी करणे शक्‍य नाही. त्या चिमुकल्यांनाही दिवाळी करता यावी, दिव्यांनी त्यांची झोपडी ...

कारंजा- मानोरा भाजपला मोठा झटका आमदार पुत्र घेणार ६ वा.तुतारी हाथात

Image
मानोरा : ज्ञायक पाटणी हे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांना भेटून तुम्ही माझ्यावर विधानसभेची उमेदवारी काटून अन्याय केला आहे त्यामुळे मी मा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आज सायंकाळी ५ वाजता तुतारी फुंकणार हे सांगण्यासाठी ते फडणवीस यांना भेटायला सागर बंगल्यावर गेले होते. आज सायंकाळी ठीक ६ वाजता ज्ञायक पाटणी तुतारी फुंकणार…

पारदर्शक आणि भयमुक्त निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांनी सूचनांचे पालन करावे खर्च निरीक्षक गोपाल कृष्ण पती

Image
वाशिम,  : निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आज जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षक गोपाल कृष्ण पती यांनी पारदर्शक आणि भयमुक्त निवडणुका पार पाडण्यासाठी विशेष सूचना दिल्या. त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी समजून, निवडणूक प्रक्रिया अचूक व व्यवस्थित पार पाडावी असे सांगितले. गोपाल कृष्ण पती यांनी निवडणुकीला लोकशाहीचा सण म्हणून संबोधित करत, प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीच्या प्रचार रॅली आणि वाहतुकीच्या माध्यमातून होणाऱ्या रोटड व मद्य तस्करीवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, संशयास्पद अर्थिक व्यवहारावर सूक्ष्म निरीक्षण करून त्याची नोंद व्हिडिओ व रजिस्टरद्वारे ठेवावी, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षांच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन करताना त्यांनी सर्व पथकांना दिलेल्या जबाबदाऱ्या वेळेवर व योग्यरित्या पार पाडल्या जातील याची खात्री अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट देऊन करावी, अशी सूचना केली. तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास, ...

उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार";

Image
विधानसभा निवडणुकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने मोठी तयारी केली असून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, आता  उद्धव ठाकरे  आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाच्या बैठका सुरू असल्याचा मोठा गौप्यस्फोट  प्रकाश आंबेडकर  यांनी केला. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.  प्रकाश आंबेकर यांनी आज गोंदिया येथे पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. आंबेडकर म्हणाले, मी सगळ्या लोकशाहीवादी आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला आवाहन करत आहे की,  उद्धव ठाकरे  यांच्या पक्षाच्या आणि भाजपाची बैठका सुरू आहेत. विधानसभा एकदा संपली की हे परत एकदा भाजपासोबत जातील, असा मोठा गौप्यस्फोट आंबेडकर यांनी केला. "याची भीती व्यक्त केली जात आहे.  म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना मुस्लिम समाज त्यांच्याकडून आश्वासन घ्यायला सांगत आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशा पद्धतीने त्यांना आश्वासन देत आहे हे पाहणे महत्वाच...

ओंकार राख यांचा शिवसेनेत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश

Image
मराठवाड्यासह संपुर्ण महाराष्ट्रात युवकांच्या हृदयात असलेल नेतृत्व ओंकार (भाऊ) राख यांचा शिवसेना (उबाठा) गटात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश युवासेनेला संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवण्याचं स्वप्न बाळगत ओंकार राख यांनी केला जाहीर प्रवेश बीड  (प्रतिनिधी):  महाराष्ट्राची आण बाण आणि शान असलेला पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या शिवसेना पक्षात महाराष्ट्रातील युवकांमध्ये प्रसिद्ध असलेले नेतृत्व ओंकार राख यांनी युवासेना प्रमूख आदित्यजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्यासह शिवसेनेचे अनिकेत  शिंदे,किशोर घुले, सागर जाधव,अमोल घुले, संदिप तांदळे सह शिवसैनिक उपस्थित होते. विधानसभा जाहीर होताच हा झालेला प्रवेश पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवून होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. ‘ तू चाल पुढं र गड्या तुला भिती कशाची, पर्वाबी कुणाची’ ————————— छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा मावळा ओंकार भैय्या राख नक्कीच येणाऱ्...

शिवशरण पुजारी उर्फ शिवा भाऊ बेलापूर विधानसभा लढविणार.

Image
वार्ताहर :  अनंतराज गायकवाड वाशी, नवी मुंबई. नवी मुंबईतील ओबीसी समाज बांधवांनी बेलापूर विधानसभेतुन धनगर समाजातील ओबीसी चळवळीत सक्रिय असलेले मल्लिकार्जुन पुजारी यांचे चिरंजीव शिवशरण पुजारी यांना एक मताने मतदान करणार असा निर्धार केला आहे. गेल्या तीन ते चार दशकापासून धनगर आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. धनगर समाजाला आरक्षण असूनही त्याची अंमलबजावणी तत्कालीन सरकार कडून करण्यात आली नसल्यामुळे महाविकास आघाडी असो वा महायुती असो धनगरांसह सकल ओबीसी समाज तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर नाराज आहे. सरकारने केलेल्या तरतुदी सकल ओबीसी समाजास मान्य नसल्याने ओबीसी मतदार येत्या विधानसभेला मतदानाद्वारे सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. त्याचीच प्रचिती नवी मुंबईत देखील पहावयास मिळणार आहे. त्यामुळे आगामी बेलापूर विधानसभेची निवडणूक सकल ओबीसी समाजाच्या मतदारांद्वारे चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे.

वृद्धांची आणि अनाथांची होणारी परवड थांबवण्यासाठी उभारलेल्या वृंदावन वृद्धाश्रमाचे नुकतेच उद्घाटन संपन्न

Image
प्रतिनिधी श्रावणी कामत रविवार दि. २० : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आढले बु. भगतवाडी या ठिकाणी युवा उद्योजक संदीप बंडू बोडके आणि मित्र परिवाराने वृंदावन फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून समाजातील वृद्धांची आणि अनाथांची होणारी परवड थांबवण्यासाठी उभारलेल्या वृंदावन वृद्धाश्रमाचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. कै. बंडू दामू बोडके यांच्या स्मरणार्थ हे वृध्दाश्रम स्थापन झाले असून आज समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या मावळ तालुक्यातील आढले या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा माजी राज्यमंत्री संजय ( बाळा ) भेगडे, अखिल किसान मोर्चाचे गणेश ( तात्या ) भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब ( अण्णा ) भेगडे यांच्यासह ज्येष्ठ प्रबोधनकार सौ. शारदाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी उद्योजक रामचंद्र मधुकर बोरगे आणि युवा उद्योजक युवराज परमेश्वर सुरवसे या विश्वस्थांसह संस्थापक अध्यक्ष संदीप बंडू बोडके यांच्यासह संस्थेचे मार्गदर्शक बाळासाहेब घोटकुले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष, सचिन घोटकुले राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पुणे जिल्ह...

शेख इरफान भाई यांचे वडील शेख हुसेन दिग्रस वाले यांचे निधन

वाशिम खबर आज महाराष्ट्राचे प्रतिनिधी   इरफान भाई  पंचर वाले  यांचे वडील  शेख हुसेन डिग्रस वाले यांचा आज सकाळी 11 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या राहत्या घरी रहेमत नगर मंगरूळपीर येथे आयोजित केला आहे. त्यांच्या मागे खूप मोठा आप्तपरिवार आहे . आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते आपल्या पवित्र आत्म्यास शांति लाभो. हीच आई भवानी चरणी प्रार्थना वाशिम खबर आवाज महाराष्ट्रच्या परिवाराच्या वतीने भावपूर्वक श्रद्धांजली