शिवशरण पुजारी उर्फ शिवा भाऊ बेलापूर विधानसभा लढविणार.



वार्ताहर :  अनंतराज गायकवाड
वाशी, नवी मुंबई.

नवी मुंबईतील ओबीसी समाज बांधवांनी बेलापूर विधानसभेतुन धनगर समाजातील ओबीसी चळवळीत सक्रिय असलेले मल्लिकार्जुन पुजारी यांचे चिरंजीव शिवशरण पुजारी यांना एक मताने मतदान करणार असा निर्धार केला आहे. गेल्या तीन ते चार दशकापासून धनगर आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. धनगर समाजाला आरक्षण असूनही त्याची अंमलबजावणी तत्कालीन सरकार कडून करण्यात आली नसल्यामुळे महाविकास आघाडी असो वा महायुती असो धनगरांसह सकल ओबीसी समाज तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर नाराज आहे. सरकारने केलेल्या तरतुदी सकल ओबीसी समाजास मान्य नसल्याने ओबीसी मतदार येत्या विधानसभेला मतदानाद्वारे सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. त्याचीच प्रचिती नवी मुंबईत देखील पहावयास मिळणार आहे. त्यामुळे आगामी बेलापूर विधानसभेची निवडणूक सकल ओबीसी समाजाच्या मतदारांद्वारे चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू