Posts

Showing posts from February, 2024

वाशिम येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व मिरवणूक 2024 जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक

Image
आज पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व मिरवणूक 2024 संबंधाने जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक पार पडली.  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे,  सर्व सन्-उत्सव बंदोबस्त, अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविणे, नागरिकांसाठी जनजागृती उपक्रम राबविणे इत्यादी मध्ये ज्याप्रमाणे कर्तव्यनिष्ठ सहकारी अधिकारी/अंमलदार व शांतताप्रिय नागरिकांचे सहकार्य असणे तेवढेच महत्त्वाचे असते अनेक विषयावर चर्चा मंथन करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (भा.पो.से.) हे होते तर अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे व उपविभागीय पोलिस अधिकारी, वाशिम श्री.सुनीलकुमार पुजारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व जिल्हाभरातील शांतता समिती सदस्य उपस्थित होते.

शाळा आणि अंगणवाडीला बोलके करा:मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविकांना सीईओ वाघमारे यांचा संदेश

Image
शैक्षणिक दर्जा सुधारण्याचे उद्दीष्ट   वाशिम:  दि. १७/2/24 एक चित्र हे हजार शब्दाएवढे प्रभावी असतं त्यामुळे शब्दांपेक्षा चित्र पाहिलेले लक्षात राहतात. तसेच एखाद्या विषयाची वारंवार उजळणी (रिव्हिजन)केली तरी ते जास्तकाळ स्मरणात राहते. त्यामुळे  जिल्हा परिषदेच्या  सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना चित्र आणि मजकुराच्या बोलके करा असा संदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी (दि.१६) दिला. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या  एकुण  ७७५ शाळा आहेत. त्यावर कार्यरत मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची एकत्रित बैठक घेण्यासाठी एकही मोठे सभागृह वाशिमात उपलब्ध  नसल्या मुळे  आजपर्यंत संबंधितांची बैठकच झाली नव्हती. मात्र ,  विद्यमान सीईओ वाघमारे यांनी सभागृहाच्या भानगडीत न पडता थेट जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच ७७५ मुख्याध्यापक ,  ७१ केंद्रप्रमुख ,  ६ गटशिक्षणाधिकारी आणि १४ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना बसवून मॅरे थॉ न बैठक घेतली.  तसेच या बैठकीनंतर लगेचच 958 अंगणवाडी सेविका,17 पर्यवेक्षिका आणि 6 बाल विकास प्...

जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या वरील हल्ल्याचा वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने निषेध आणि पोलिस प्रशासनाला निवेदन..

Image
वडवणी/ प्रतिनिधी      श्रावणी कामत *मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडियाचे सर्व पदाधिकारी सदस्य पत्रकार यांच्या वतीने मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांचे आदेशानुसार  व डिजिटल मिडिया राज्य कार्याध्यक्ष अनिलराव वाघमारे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार  निखिल वागळे यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला आहे..या झुंडशाहीच्या विरूध्द सर्वांनी व्यक्त झालं पाहिजे..या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व यातील दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज दि.11 फेब्रुवारी रविवार रोजी दुपारी 12.00 वाजता वडवणी पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मराठी पत्रकार परिषद डिजिटल मिडिया राज्य कार्याध्यक्ष अनिलराव वाघमारे, अँड विनायक जाधव (मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका अध्यक्ष ),मा.सतिषराव सोनवणे ( सचिव )मा.सुधाकर काका पोटभरे(पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती वडवणी तालुका निमंत्रक)मा.महेशराव सदरे(पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती वडवणी तालुका समन्यक), शांतिनाथ जैन ...