Posts

Showing posts from October, 2026

न्यायदेवतेच्या मंदिरातील कर्मचाऱ्यांची दिवाळी आंदोलनाच्या छायेत!

Image
‘समान वेतन’ तत्त्वानुसार सुधारित वेतनश्रेणीची मागणी प्रलंबित; राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा शांततामय आंदोलनाचा इशारा मंगरूळपीर | सुधाकर चौधरी न्यायदेवतेच्या मंदिरात कार्यरत राहून न्यायव्यवस्थेचा गाडा सुरळीत चालविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘समान वेतन’ या तत्त्वानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करावी , या मागणीसाठी यंदाची दिवाळी साजरी न करण्याची भूमिका राज्यातील सर्व दुय्यम न्यायालयांतील कार्यरत कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. केवळ स्वतःच्या मागण्यांसाठी नव्हे, तर न्यायालयीन प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या वेतनविषयक न्याय्य अपेक्षांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततामय आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. उच्च न्यायालयाचा प्रस्ताव; शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा कर्मचाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने ३० जानेवारी २०२५ रोजी सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविला होत...