Posts

चव, गुणवत्ता आणि सेवाभावाचा संगम; मुकेश राठी यांच्या 'अन्नपूर्णा रेस्टॉरंट'चे दिमाखदार उद्घाटन

Image
अकोला रोडवरील खरेदी-विक्री कॉर्नर येथे 'अन्नपूर्णा रेस्टॉरंट'चा दिमाखदार शुभारंभ; चव, गुणवत्ता आणि सेवाभावाचा नवा अध्याय सुरू मंगरूळपीर | सुधाकर चौधरी मंगरूळपीर शहरातील खाद्यसंस्कृतीला नवी दिशा देणारा आणि ग्राहकांच्या विश्वासाला अधिक बळकटी देणारा सोहळा अकोला रोडवरील खरेदी-विक्री कॉर्नर येथे पार पडला. शहरातील नामांकित उद्योजक मुकेश राठी यांच्या **'अन्नपूर्णा रेस्टॉरंट'**चा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गेली अनेक वर्षे **'बालाजी रेस्टॉरंट'**च्या माध्यमातून हजारो ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या राठी यांनी आता आधुनिक सुविधा, आकर्षक वातावरण आणि दर्जेदार सेवेसह नव्या रूपात 'अन्नपूर्णा रेस्टॉरंट' सुरू करून खाद्यप्रेमींसाठी आणखी एक विश्वासार्ह ठिकाण उपलब्ध करून दिले आहे. मुकेश राठी यांनी व्यवसायात केवळ नफा नव्हे, तर ग्राहकांचा विश्वास आणि समाधान याला नेहमीच प्राधान्य दिले. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आला आहे. चविष्ट आणि दर्जेदार भोजन, स्वच्छता, वेळेवर से...

जनतेच्या विश्वासाचा दीपस्तंभ, सहजीवनाचा आदर्श आणि निष्ठेच्या नात्यांची सुवर्णगाथा

Image
माजी आमदार पुरुषोत्तमभाऊ राजगुरू व सौ. सीमाताई राजगुरू यांच्या लग्नाच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त... राजकारण हे केवळ पद, प्रतिष्ठा आणि सत्तेचे क्षेत्र नसते; ते माणसे जोडण्याचे, नाती जपण्याचे आणि विश्वास कमावण्याचे क्षेत्र असते. आयुष्याच्या प्रवासात अनेक सहप्रवासी भेटतात, अनेक चेहरे येतात-जातात, परंतु काही नाती अशी असतात जी काळाच्या कसोटीवर अधिक उजळून निघतात. अशा नात्यांच्या, संघर्षांच्या, यशाच्या आणि समर्पणाच्या सुवर्ण इतिहासाला आज चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. माजी आमदार पुरुषोत्तमभाऊ राजगुरू आणि सौ. सीमाताई राजगुरू यांचा हा सहजीवन प्रवास म्हणजे प्रेम, त्याग, विश्वास आणि निष्ठेच्या धाग्यांनी विणलेली एक प्रेरणादायी गाथा आहे. चार दशकांचा हा प्रवास केवळ संसाराचा इतिहास नाही, तर समाजकारण, राजकारण, अध्यात्म आणि मानवी मूल्यांचा एक जिवंत दस्तऐवज आहे. पुरुषोत्तमभाऊ राजगुरू हे नाव वाशिम जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात आदराने घेतले जाते. भारतीय जनता पक्षाशी अखंड निष्ठा राखत, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत आणि सर्व स्तरांतील लोकांना सोबत घेऊन चालत त्यांनी जनतेच्या मनात कायमचे ...

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

Image
शासन नियम एक सांगतात, प्रशासन दुसरे; अनुकंपा नियुक्तीच्या फाईलमध्ये नेमकं पाणी कुठे मुरलं? मंगरूळपीर | सुधाकर चौधरी मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला तातडीचा आधार मिळावा म्हणून अस्तित्वात आलेली अनुकंपा नियुक्ती योजना मंगरूळपीरमध्ये मात्र १४ वर्षांच्या प्रतीक्षेची शिक्षा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. तब्बल १४ वर्षे नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अविनाश काशिनाथ इंगळे यांनी अखेर नगर परिषद कार्यालयासमोर प्रतिकात्मक फाशी आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनुकंपा ज्येष्ठता यादीत नाव, शासन निर्णयांचा आधार, रिक्त पदांची उपलब्धता आणि पात्रतेबाबतचा दावा असूनही नियुक्ती होत नसल्याने नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. १४ वर्षांची प्रतीक्षा; पण न्यायाचा पत्ता नाही वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाला आधार मिळावा म्हणून अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करण्यात आला. मात्र एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल १४ वर्षे उलटून गेल्यानंतरही नियुक्ती मिळालेली नाही. या काळात अर्ज, निवेदने, कार्यालयीन फेऱ्या, वरिष्ठांकडे पा...

मंगरूळपीर नगर परिषदेत ऐतिहासिक क्षणसहाय्यक जिल्हाधिकारी Akash Verma यांचा जल्लोषात सत्कार

Image
मंगरूळपीर, दि. १६ फेब्रुवारी २०२६ : शहराच्या प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि विकासाभिमुख दृष्टीकोनाची नवी परंपरा रुजविणारे मंगरूळपीर नगर परिषदेचे प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी तथा भारतीय प्रशासन सेवेतील सहाय्यक जिल्हाधिकारी Akash Verma यांचा सोमवारी भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. भाजप व मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने शहरात विकासाभिमुख प्रशासनाचा संदेश दिला. उपनगराध्यक्ष Anil Bhau Gawande यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि आकाश वर्मा यांच्या प्रतिमेचे तैलचित्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले होते. यावेळी भाजप गटनेते Ganesh Khode , सर्व समितीचे सभापती प्रा. Virendrasinh Thakur , ॲड. Sudhir Ghodchar , सौ. लता चीतलांगे, सपना बजाज, श्रीमती प्रतिमा भोजने, श्रीमती आशाबाई पवार, सौ. शबाना परवीन अझर मिर्झा, श्रीहरी इंगोले, राजू जयस्वाल, प्रा. नंदलाल पवार, फैजल खान, अझर मिर्झा, उन्मेश भोजने, सचिन पवार, गणेश बजाज यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनात आमूलाग्र ब...

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

Image
मंगरूळपीर | (सुधाकर चौधरी) व्यक्तीला जबरदस्तीने वाहनात बसवणे – बेकायदेशीर ताबा?   निर्जन ठिकाणी सोडणे – जीवितास धोका? ओळखपत्र जप्त करणे – अधिकारांचा गैरवापर? पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आघात? मंगरूळपीर येथील सुज्ञ नागरिक तथा साप्ताहिकाचे प्रतिनिधी शेख इरफान (वय 55) यांनी आरटीओ अधिकाऱ्यांच्या कथित मनमानीविरोधात थेट महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग यांच्याकडे तक्रार दाखल केली असून, संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन निर्जन वस्तीत सोडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. नेमकं काय घडलं? दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी वाशिम–मंगरूळपीर मार्गावर दामोदर जिनिंगजवळ आरटीओ विभागाची (वाहन क्रमांक MH-04-6537) गाडी उभी होती. गाडीत एक महिला आरटीओ अधिकारी व चालक उपस्थित होते. शेख इरफान हे पत्रकार असल्याने त्यांनी भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही, असा जाब संबंधित अधिकाऱ्यांना विचारला. “अनेक निष्पापांचे जीव गेले, तरीही कारवाई का नाही?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी आपले ओळखपत्रही दाखवले. मात्र, आरोपानुसार,...

थंडीवर माणुसकीची ऊब! तुळजापूर-मंगरुळपीर येथे गरजूंना ब्लॅंकेट वाटप

Image
मान्यवरांच्या हस्ते सामाजिक बांधिलकीचा हृदयस्पर्शी उपक्रम तुळजापूर / मंगरुळपीर — कडाक्याच्या थंडीमध्ये गरजूंना दिलासा देत माणुसकीची ऊब जपणारा हृदयस्पर्शी उपक्रम तुळजापूर व मंगरुळपीर येथे उत्साहात पार पडला. नतीमाता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच मुकबधिर व दिव्यांग निवासी विद्यालय, तुळजापूर आणि चित्रऋषी महाराज वृद्धाश्रम, वरुड (ता. मंगरुळपीर) येथे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अविस रघुवंशी, उत्तम पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील म्हातारमारे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांनी गरजूंशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि सदैव साथ देण्याचा विश्वास दिला. “समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे हीच खरी सेवा,” असे मत व्यक्त करत मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. थंडीच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना, दिव्यांग बांधवांना व वृद्धांना मोठा दिलासा मिळाला. कार्यक्रमात लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद पाहून उपस्थितांचे डो...

जी. एच. रायसोनी विद्यापीठात संशोधन पद्धती कार्यशाळा उत्साहात पार

Image
उत्कृष्ट संशोधनासाठी नव्या पिढीला व्यासपीठ" ( अनिता यादव ) अमरावती, 13 ऑक्टोबर:  जी . एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथे पीएच.डी. संशोधकांसाठी आयोजित पाच दिवसीय संशोधन पद्धती कार्यशाळा 8 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेला 40 हून अधिक संशोधकांनी उपस्थिती लावली. संशोधन डिझाइन, नैतिकता, डेटा विश्लेषण व विद्वत्तापूर्ण लेखन यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचा उद्देश संशोधन प्रक्रियेबाबत संशोधकांमध्ये सुस्पष्टता आणि प्रभावी कौशल्यांचा विकास करणे हा होता. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. प्रांतिक बनर्जी (प्राध्यापक, इंग्रजी विभाग, हिस्लॉप कॉलेज, नागपूर) यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाले. “तुमचे संशोधन प्रभावी आहे का?” या विषयावर त्यांनी समाजोपयोगी आणि वास्तवाशी संबंधित संशोधनावर भर देण्याचे महत्त्व विशद केले. या प्रसंगी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. स्नेहिल जैसवाल, पीएच.डी. सेलचे प्रभारी डॉ. श्रीकांत चवाटे, परीक्षा नियंत्रक डॉ. विनायक डकरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. डॉ. चवाटे यांनी “संशोधन परिदृश्याचे नेव्हिगेशन...