मतदारसंघाचा संपूर्ण विकास हेच बहूजन मुक्ती पार्टीचे खुले धोरण - संजय ढळे
पत्रकार परिषदेत केला पक्षाच्या विविध धोरणाचा उलगडा सुधाकर चौधरी वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक वाशिम - राज्यात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून या निवडणूकीत महापुरुषांच्या विचारधारेवर कार्य करणारी बहूजन मुक्ती पार्टी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी उभी राहीली आहे. तसेच ५०० रुपयाच्या स्टॅम्पवर विकासाचे धोरण लिहून देणारी बहूजन मुक्ती पार्टी हा एकमेव पक्ष असून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत अशी ग्वाही वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघात खाट या चिन्हावर उभे असलेले बहूजन मुक्ती पार्टीचे उमेदवार संजय सखाराम ढळे यांनी पत्रपरिषदेत दिली. निवडणूकीच्या अनुषंगाने मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी अकोला हायवेवरील हॉटेल अॅम्बेसेडरच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेला उमेदवार संजय ढवळे यांच्यासह पदाधिकारी बहूजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय सचिव सौरभ गायकवाड, डॉ. रवि जाधव, जिल्हाध्यक्ष आदेश गवई, युवा जिल्हाध्यक्ष शाम खिल्लारे, धम्मदास वाकोडे, उल्हास सावके, मंगेश कांबळे, गायकवाड सावंगा, गजानन गवई उपस्थित होते. यावेळी संजय ढळे यांनी पक्षाचा जाह...