Posts

Showing posts from June, 2023

अकोल्यातील धाड प्रकरणात सर्व अधिकाऱ्यांना शनिवारी पुण्यात बोलवले आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या ४५ अधिकाऱ्यांना पुण्यात येण्याचे फर्मान राज्याचे कृषी संचालकांनी सोडले आहे. त्या विषयावर आज बैठक होत आहे.

Image
अकोला शहरात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावावर कृषी विभागाच्या पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकार नसलेले अनेक खाजगी व्यक्ती असल्याचा आरोप होत आहे. या पथकात कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा स्वीय सहायक असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या प्रकरणावरुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले होते. या प्रकरणातील गोंधळ अन् सरकारवर होत असलेली टीका पाहता मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्र्यांना विचारणा केल्याचेही समोर आले होते. आता या प्रकरणावर राज्याचे कृषी संचालकांनी ४५ अधिकाऱ्यांना पुण्यात बोलवले आहे. त्यासंदर्भात त्यांनी टीव्ही ९ मराठीला माहिती दिली. अकोल्यात ती धाड नव्हती तर ती कारवाई होती, असा दावा राज्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी केला आहे. बोगस बियाणे किंवा कीटकनाशके यांची विक्री रोखण्यासाठी या कारवाया आम्ही दरवर्षी करतो, असे त्यांनी म्हटले आहे. कारवाईत सहभागी असलेले सर्व जण अधिकारीच होते. त्या सर्व अधिकाऱ्यांना म्हणजेच जवळपास ४५ अधिकाऱ्यांना मी बैठकीसाठी बोलावले आहे. हे सगळे आधिकारी अकोल्यात झालेल्या धाडी संदर्भातील आहेत. या बैठकीत सगळ्यांची चौकशी...

दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला... दुचाकी ट्रक अपघातात मृत्यू

Image
वाशिम :- जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा गावाचे जवान योगेश सुनिल आडोळे यांचे काल रात्री ९ वाजताच्या सुमारास कारंजा-मंगरुळपिर महामार्गावर पोटी फाट्याजवळ अपघात होऊन निधन झाले आहे. योगेश हे भारतीय सैन्य दलात मागील चार वर्षांपासून कार्यरत होते. भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे व्रत घेलेले २४ वर्षीय योगेश सुनील आडोळे हे जम्मू काश्मीर मधील राजुरी येथे सेवा देत होते. २०१९ साली ते सैन्यात दाखल झाले होते. महिन्याभराची सुट्टी घेऊन योगेश दोन दिवसांपूर्वीच गावी परत आले होते. काल दुपारी मित्रांसोबत एका लग्न समारंभात गेल्या नंतर सायंकाळी ते गावी परतले व रात्री काही साहित्य घेण्यासाठी महामार्गावर आले होते. त्याच दरम्यान मंगरुळपिर वरून कारंजा कडे जाणाऱ्या एम एच २७ बी एक्स ११९१ या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात योगेशला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अत्यंत हुशार आणि मनमिळावू असलेल्या योगेशने प्रचंड मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. योगेश हा आईवडिलांना एकुलता एक म...

विनोद डेरे यांना मॅक्स महाराष्ट्र व महापरिवर्तन वादी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Image
मंगरूलपीर : रविवारी (ता.11) सायंकाळी ५:३० वा. टी एस के मंगल भवन, (तुरे हॉल) नागोठणे, ता. रोहा, जि. रायगड येथे मंगरूलपीर निवासी वाशिम पत्रकार संघाचे जिला अध्यक्ष विनोद डेरे यांना  शिवरायांचे वंशज  युवराज संभाजी राजे,तसेच भीमरायांचे वंशज मा.आनंदराज आंबेडकर सरसेनानी रिपब्लिकन सेना, मा .राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, मा .सुनील तटकरे, खासदार , रायगड-रत्नागिरी मा.आदीती तटकरे आमदार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितीत  विनोद डेरे यांचे कार्याची दखल घेउन पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी  Max Maharashtra Award प्रदान करण्यात आला . सदर कार्यक्रमाचे आयोजन मैक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर व महापरिवर्तनवादी पत्रकार संघाचे अध्यक्ष धम्मशील सावंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला  आहे. विनोद डेरे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रेम जितकं जुनं होत जातं, तितकं मुरत जातं... 'आठवणी'चे पोस्टर रिलीज

Image
- सिद्धांत सावंत दिग्दर्शित ‘आठवणी’ होणार ७ जुलैला सर्वत्र प्रदर्शित! कौटुंबिक आणि भावनिक चित्रपटांना मराठी प्रेक्षक नेहमीच भरभरून प्रेम देत आले आहेत. यामुळेच दिग्दर्शक सिद्धांत सावंत आपल्यासमोर असाच एक खास चित्रपट घेऊन सज्ज आहेत. ‘आठवणी’ असे या चित्रपटाचे नाव असून आज (ता. १३) त्याचे पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरवरून असं लक्षात येतंय की, मराठी प्रेक्षकांसाठी अनेक दिवसांनंतर असा भावनिक आणि नात्यांची गोष्ट सांगणारा चित्रपट येत आहे.  सिद्धांत सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असून पोस्टरवरून त्याची प्रगल्भता लक्षात येते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या पोस्टरवर झळकत आहेत, तर त्यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत सुहृद वार्डेकर आणि वैष्णवी करमरकर दिसत आहेत. याशिवाय अभिनेता निनाद सावंत साहाय्यक भूमिकेत दिसेल. नात्यांची गुंतागुंत, एकमेकांवर असलेलं निर्व्याज प्रेम आणि आपल्या जोडीदाराप्रती असलेली ओढ या पोस्टरमधून दिसून येते. त्यामुळे या चित्रपटाचे कथानक नक्की काय असेल हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  मिनाश प्रॉडक्शन प्रस्तुत आणि सिद्...