मंगरूळपीर नगर परिषदेत ऐतिहासिक क्षणसहाय्यक जिल्हाधिकारी Akash Verma यांचा जल्लोषात सत्कार
मंगरूळपीर, दि. १६ फेब्रुवारी २०२६ : शहराच्या प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि विकासाभिमुख दृष्टीकोनाची नवी परंपरा रुजविणारे मंगरूळपीर नगर परिषदेचे प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी तथा भारतीय प्रशासन सेवेतील सहाय्यक जिल्हाधिकारी Akash Verma यांचा सोमवारी भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. भाजप व मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने शहरात विकासाभिमुख प्रशासनाचा संदेश दिला. उपनगराध्यक्ष Anil Bhau Gawande यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि आकाश वर्मा यांच्या प्रतिमेचे तैलचित्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले होते. यावेळी भाजप गटनेते Ganesh Khode , सर्व समितीचे सभापती प्रा. Virendrasinh Thakur , ॲड. Sudhir Ghodchar , सौ. लता चीतलांगे, सपना बजाज, श्रीमती प्रतिमा भोजने, श्रीमती आशाबाई पवार, सौ. शबाना परवीन अझर मिर्झा, श्रीहरी इंगोले, राजू जयस्वाल, प्रा. नंदलाल पवार, फैजल खान, अझर मिर्झा, उन्मेश भोजने, सचिन पवार, गणेश बजाज यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनात आमूलाग्र ब...