जी. एच. रायसोनी विद्यापीठात संशोधन पद्धती कार्यशाळा उत्साहात पार
उत्कृष्ट संशोधनासाठी नव्या पिढीला व्यासपीठ" ( अनिता यादव ) अमरावती, 13 ऑक्टोबर: जी . एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथे पीएच.डी. संशोधकांसाठी आयोजित पाच दिवसीय संशोधन पद्धती कार्यशाळा 8 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेला 40 हून अधिक संशोधकांनी उपस्थिती लावली. संशोधन डिझाइन, नैतिकता, डेटा विश्लेषण व विद्वत्तापूर्ण लेखन यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचा उद्देश संशोधन प्रक्रियेबाबत संशोधकांमध्ये सुस्पष्टता आणि प्रभावी कौशल्यांचा विकास करणे हा होता. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. प्रांतिक बनर्जी (प्राध्यापक, इंग्रजी विभाग, हिस्लॉप कॉलेज, नागपूर) यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाले. “तुमचे संशोधन प्रभावी आहे का?” या विषयावर त्यांनी समाजोपयोगी आणि वास्तवाशी संबंधित संशोधनावर भर देण्याचे महत्त्व विशद केले. या प्रसंगी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. स्नेहिल जैसवाल, पीएच.डी. सेलचे प्रभारी डॉ. श्रीकांत चवाटे, परीक्षा नियंत्रक डॉ. विनायक डकरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. डॉ. चवाटे यांनी “संशोधन परिदृश्याचे नेव्हिगेशन...