शिवसेना (शिंदे गट) निवडणूक आढावा बैठक उत्साहात पार


कारंजा |  आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. ही बैठक पक्षाच्या वरिष्ठ नेत्या व आमदार आदरणीय सौ. भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक प्रभाग व जिल्हा परिषद सर्कल निहाय नियोजन करून अधिकाधिक उमेदवार विजयी करण्याच्या दृष्टीने कार्यपद्धती आखण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना संपूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप भोजराज होते. यावेळी वैशालीताई येळणे (जिल्हा प्रमुख, महिला आघाडी), राजदादा चौधरी (विधानसभा संपर्क प्रमुख), मंगेश पाटील मुंदे (तालुका प्रमुख, कारंजा), अतुल पाटील दरेकर (तालुका संघटक), अरुणभाऊ बिकड (शहर प्रमुख, कारंजा), संदेशभाऊ जिंतूरकर (शहर संघटक, कारंजा), अजय पाटील मते (युवासेना विधानसभा प्रमुख), श्याम पावडे पाटील (युवासेना तालुका प्रमुख, कारंजा), तसेच प्रफुल गवई, शुभम भोयर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

बैठकीत स्थानिक प्रश्नांबरोबरच निवडणूक व्यवस्थापन, मतदार संपर्क, प्रचार यंत्रणा आणि बूथ स्तरावरील संघटनबांधणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

कार्यकर्त्यांचा उत्साह व एकजूट पाहता येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) निश्चितच दमदार कामगिरी करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू