Posts

Showing posts from June, 2025

भूमिपूजन समारंभ संपन्न : मंगरुळनाथ नगर परिषदेत दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या सिमेंटकरणासाठी प्रारंभ

Image
मध्ये दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम -सिमेंट रस्त्यांच्या भूमिपूजनाने विकासाच्या नव्या वाटा खुल्या !" मंगरुळनाथ (सुनील भाऊ मालपाणी) – जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत नागरी दलितेत्तर योजना अन्वये मंगरुळनाथ नगर परिषदेच्या प्रभाग क्र. ९ मध्ये सिमेंट रस्त्यांच्या दोन कामांचा भूमिपूजन समारंभ दिनांक २९ जून रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या योजनेअंतर्गत पुढील कामे हाती घेण्यात आली आहेत: प्रभाग क्रमांक ९: यशवंतराव चव्हाण महाविद्यालयापासून ते वरुड रस्त्यापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम अंदाजित खर्च – ₹१,२५,००,०००/- प्रभाग क्रमांक ९: यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलापासून ते श्री. सुनील लांडगे यांच्या मोटार गॅरेजपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम अंदाजित खर्च – ₹३०,००,०००/- या दोनही विकासकामांचा भूमिपूजन सोहळा वाशिम-मंगरूळनाथ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. श्याम रामचरणजी खोडे यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. श्री. चंद्रकांतदादा सुभाषरावजी ठाकरे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मा. अध्यक्ष, जिल...

विधवा शेतकरी महिलेस मदतीचा हात; उपअधीक्षक साहेबांचा सकारात्मक पुढाकार!

Image
  कारंजा (सुधाकर चौधरी): कारंजा येथील भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक साहेबांची नुकतीच एका सामाजिक भान असलेल्या महत्त्वाच्या विषयावर भेट घेण्यात आली. एका विधवा महिलेला तिच्या शेतजमिनीच्या मोजमापासंदर्भात वारंवार अडथळे निर्माण होत असल्याने तिच्या शेतीचे मोठे नुकसान होत होते. विशेषतः जंगली प्राण्यांच्या सततच्या उपद्रवामुळे तिच्या शेतीचे संरक्षक मोजमाप त्वरित होणे अत्यावश्यक झाले होते. या पार्श्वभूमीवर, संबंधित कार्यालयात भेट देत ही बाब सविस्तरपणे मांडण्यात आली. यामध्ये उपअधीक्षक साहेबांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत, तातडीने आवश्यक त्या अधिकृत प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या तत्परतेमुळे संबंधित विधवा महिलेसह अनेक अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या सहकार्यामुळे आता मोजमाप प्रक्रिया गतिमान होणार असून, यामुळे केवळ संबंधित महिलेलाच नव्हे तर भविष्यात अशीच अडचण भोगणाऱ्या नागरिकांनाही न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सदर सहकार्याबद्दल उपअधीक्षक साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. जय...

विदर्भ लोककलावंत संघटना आणि पत्रकार संघाकडून स्व. उमेश कडोळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

Image
“प्रामाणिक, हसतमुख, हरहुन्नरी कलाकार गमावला!” 📌 खासदार संजयजी देशमुख, आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना कारंजा (लाड) : कारंजा येथील गोंधळी समाजाचे हरहुन्नरी कलाकार , उत्कृष्ट संबळवादक व डफवादक आणि अकोला जिल्हा सत्र न्यायालयात लिपीक पदावर कार्यरत असलेले स्व. उमेश मधुकरराव कडोळे यांचे अलीकडे दुःखद निधन झाले. ते कारंज्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचे लहान बंधू होते. प्रामाणिक, हजरजबाबी, हास्यमुख, सुस्वभावी व सर्वांशी आपुलकीने वागणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. नोकरीपूर्वी त्यांनी आपल्या गोंधळी कलेच्या संवर्धनासाठी अथक परिश्रम घेतले. नवरात्र उत्सव आणि लग्नप्रसंगी त्यांना विशेष आमंत्रित केले जात असे. त्यांनी श्री कामक्षा मातेच्या आरत्यांसह शेकडो गोंधळी गीतांची रचना केली होती, जी आजही विविध गोंधळजागर कार्यक्रमांमध्ये गायिली जातात. नोकरीनिमित्त अकोला येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांना असाध्य आजाराने ग्रासले आणि अचानक उपचाऱादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयोवृद्ध आईला पुत्रशोक व बंधूंना अपूरा झालेला भाऊ गमवण...

"आणीबाणी — भारताच्या लोकशाहीवरील काळा डाग"— प्रा. सुधीरजी घोडचर यांचे प्रतिपादन

Image
मानोरा, ता. २५ जून — "२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेली आणीबाणी ही भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस ठरला. हुकूमशाही पद्धतीने घेतलेल्या या निर्णयामुळे संविधानाचे उल्लंघन झाले, नागरिकांचे मौलिक हक्क हिरावून घेण्यात आले आणि विरोधकांवर अन्यायाचा मारा करण्यात आला," असे ठाम प्रतिपादन प्रा. सुधीरजी घोडचर यांनी केले. भारतीय जनता पार्टी मानोरा मंडळाच्या वतीने आयोजित “आणीबाणी – काळा दिवस” या विशेष कार्यक्रमात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते श्री. महादेवराव ठाकरे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी चितलांगे व मासूपा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांचा समावेश होता. प्रा. घोडचर यांनी आपल्या भाषणात आणीबाणीच्या २१ महिन्यांच्या काळातील घटनांचे चिकित्सक विश्लेषण करताना सांगितले की, “या काळात ‘मिसा’सारख्या कायद्याचा गैरवापर करून कोणतीही चौकशी न करता राजकीय विरोधकांना व सर्वसामान्य नागरिकांना तुरुंगात डांबण्यात आले. नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुकाचे दर्शन, श्री.गुरुदेव सेवा मंडळाचा भव्य मेळावा.

Image
कारंजा (लाड) :-अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारा संचालीत श्री.गुरुदेव सेवा मंडळ,श्री.गुरुदेव महिला व पुरुष भजनी मंडळ कारंजा (लाड) तालुक्याच्या वतीने,गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका गुरुकुंज ते पंढरपूर प्रचार यात्रेच्या निमित्त्याने,श्री.गुरुदेव सेवा मंडळ परिवाराचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे भव्य आयोजन, श्री.गुरुदेव सेवाश्रम ग्रामनाथ भवन शांतीनगर कारंजा (लाड) येथे दिनांक १ जुलै २०२५ मंगळवार रोजी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा,कारंजाचे माजी नगराध्यक्ष मा. अरविंद लाठीया, कारंजा (लाड) यांच्या अध्यक्षतेखाली, उद्घाटक माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांचे शुभ हस्ते श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ प्रचारक श्रीकृष्ण पाटील नेमाने, दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी सुधिर देशपांडे, दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी विजय  काळे, विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक करंजमहात्म्यचे संपादक संजय कडोळे, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर व्यवहारे, श्रीकृष्ण पाटील मुंदे डॉ. दिलीप रावजी गावंडे यांच्या प्रमुख उपस्थि...

महाराष्ट्राच्या नावाने जागतिक व्यासपीठावर बुलंद आवाज!अमोल भाऊ पाटणकर यांचे ‘Digital Horizons’ परिषदेत स्फूर्तीदायक भाषण

Image
📍 मुंबई,  तंत्रज्ञान आणि नवसर्जनाच्या नव्या पर्वात महाराष्ट्र आघाडीवर! बीकेसी, मुंबई येथील हॉटेल ट्रायडेंटमध्ये नुकत्याच पार पडलेल्या “Digital Horizons: Transforming Creative Industries” या भव्य Indo-Pacific परिषदेत, महाराष्ट्राच्या वतीने उद्घाटनपर भाषणाची जबाबदारी पेलली ती — अमोल भाऊ पाटणकर यांनी. ही परिषद अमेरिकेचे स्टेट डिपार्टमेंट , World Learning , आणि Digital Communication Network यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. परिषदेमध्ये AI, AR/VR, ब्लॉकचेन, IPR यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांतील तज्ञांनी सहभाग घेतला. जगभरातील 115 हून अधिक प्रतिनिधी या मंचावर एकत्र आले. 🔹 "महाराष्ट्र आता मागे नाही, आघाडीवर आहे!" अमोल भाऊ पाटणकर यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे नमूद केले की, “एकेकाळी विकासाच्या स्पर्धेत मागे पडलेला महाराष्ट्र, आज मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायक नेतृत्वामुळे तंत्रज्ञान, नवोपक्रम व डिजिटल गव्हर्नन्सच्या आघाडीवर झेप घेत आहे.” त्यांनी महाराष्ट्रातील स्टार्टअप्स, डिजिटायझेशन, क्रिएटिव्ह पॉलिसीज आणि डिजि...

हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसेचे तीव्र आंदोलनहिंदी पाठ्यपुस्तकांची होळी करून शासनाचा निषेध

Image
वाशिम - महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शुक्रवार, १९ जुन रोजी स्थानिक पाटणी चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू किडसे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात पहिली ते चौथीच्या हिंदी पाठ्यपुस्तकांची होळी करण्यात आली. या आंदोलनाच्या माध्यमातून मनसेने शासनाचा जोरदार निषेध नोंदवला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजु किडसे यांनी स्पष्ट इशारा दिला की, राज्य शासनाने हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपात राज्यभरात आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनात मनसेचे जिल्हा सचिव गजानन वैरागडे, जिल्हा उपाध्यक्ष अतिश डहाळे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष गजानन कडणे, अनिकेत शेटे, वाशिम तालुकाध्यक्ष विठ्ठल राठोड, मालेगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, वाशिम शहराध्यक्ष शिवाजी इंगोले, वाहतूक शहराध्यक्ष उमेश टोलमारे, मालेगाव उपतालुकाध्यक्ष रामेश्वर वाघ, अनसिंग सर्कल अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, महाराष्ट्र सैनिक राजू हिंगणे, महादेव डाखोरे, किशोर चव्हाण, बाळू रोकडे, शिवाजी चव्हाण, य...

बजरंग दलाच्या तत्परतेने तीन निरपराध जीव वाचले! गोवंश तस्करीचा पर्दाफाश —

Image
प्रशासनाची उदासीनता गंभीर; गुन्हेगार मोकाट, कायदा कुठे झोपलाय? मंगरूळनाथ (प्रतिनिधी): तालुक्यातील गोवंश तस्करीचा व्यवसाय दिवसेंदिवस बळावतो आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे तस्करांचे फावले असून, काल रात्री उशिरा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर कारवाई करून एक गाय आणि दोन गोऱ्यांचे प्राण वाचवले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगरूळनाथ तालुक्यातील एका आडरस्त्यावर घडली. संशयास्पद वाहनाची माहिती मिळताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ पाठलाग करून ते थांबवले. वाहनाच्या झडतीत एक जिवंत गाय व दोन गोऱ्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याचे आढळले. ही कारवाई झाल्यानंतर तस्कर अंधारात पसार झाले. घटनास्थळी स्थानिक पोलिसांना बोलावण्यात आले असून चौकशी सुरु आहे. 🗣️ "हा फक्त एक नमुना आहे; तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोवंश कत्तल व गोमांस निर्यातीचा काळाबाजार चालतोय. प्रशासनाला वारंवार सूचना करूनही काहीच ठोस उपाय योजना होत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे." – सतीशभाऊ हिवरकर, तालुका प्रमुख, बजरंग दल या प्रकरणावरून स्पष्ट होते की, मंगरूळनाथ व आसपासच्या परिसरात अ...

घरकुलासाठी फासेपारधी कुटुंबाचा आक्रोश – "आत्महत्येच्या उंबरठ्यावर..."

Image
कुडाच्या घरात राहण्याची वेळ; शासनाच्या आश्वासनांना कंटाळून तीव्र आंदोलनाचा इशारा वाशिम, ११ जून – "गेल्या अनेक वर्षांपासून कुडाच्या घरात राहतोय... घरकुलासाठी अर्ज करूनही आश्वासनांशिवाय काही मिळालं नाही... आता आत्महत्येच्या उंबरठ्यावर आलोय," – असं हताश वक्तव्य करत मालेगाव तालुक्यातील वसारी येथील फासेपारधी समाजातील सौ. उज्वला शंकु पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून शासनाच्या उदासीनतेविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. वसारी येथील रहिवासी पवार कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय गावठाणातील सर्वे नं. १३८ मधील जागेवर कुडामाती व ताट्याचं घर बांधून राहतात. त्यांच्याकडे १९९५-९७ सालचा नमुना १ ई, २०११-१२ च्या ग्रामपंचायतीच्या करपावत्या, तसेच जागेच्या दंड भरण्याचे शासकीय पुरावे असूनही, त्यांच्या घरकुलाच्या मागणीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. २०१६ साली सौ. लता संतोष पवार यांच्यासह १२ महिलांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन दिलं होतं. २०२४ मध्ये लेखी पत्र देऊन महिन्याभरात प्रस्ताव सादर केला ज...

सरकारी दवाखान्यात जीवाशी खेळ ! - डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मातेला इन्फेक्शन"

प्रसूतीत झालेल्या हलगर्जीमुळे महिलेला इन्फेक्शन; ‘कापूस काढा’ म्हणणाऱ्या डॉक्टरांविरोधात संतप्त तक्रार – मालेगाव व मंगरुळपीरचा चार्ज एकाच डॉक्टरकडे; रुग्णालयात मनमानी कारभार सुरूच! मंगरुळपीर (जि. वाशीम), ता. १८ जून – मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीदरम्यान झालेल्या अमानुष हलगर्जीपणामुळे एका महिलेला गंभीर संसर्ग झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पारवा येथील देवानंद गायकवाड यांनी यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलिस ठाण्यात थेट तक्रार दाखल करत दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. गायकवाड यांची पत्नी २३ मे रोजी प्रसूतीसाठी मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. २६ मे रोजी घरी सोडल्यानंतर तिच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला. तीव्र वेदना आणि अस्वस्थतेची तक्रार असतानाही डॉक्टरांनी “तब्येत ठिक आहे, काळजी करू नका” असे थातुरमातुर उत्तर देऊन जबाबदारी झटकली. मात्र, जेव्हा करंजा येथील खासगी डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले – टाकलेले टाके व्यवस्थित न तपासता, त्यावर लावलेला कापूसच काढण्यात आलेला नव्हता! त्यामुळे गंभीर इन्फेक्शन झाले होते. ...

ऑनलाईन राजयोग मेडिटेशन कोर्स — 21 जूनपासून आत्मजागृतीचा नवा प्रवास!

Image
🧘 मंगरूळपीर  , 21 जून 2025: आत्मजागृती, मानसिक शांतता आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश घेऊन ब्रह्माकुमारीज़ सेवा केंद्र, अकोला यांच्या वतीने "ऑनलाईन राजयोग मेडिटेशन कोर्स" आयोजित करण्यात आला आहे. हा पाच दिवसीय विशेष कार्यक्रम 21 जून ते 25 जून 2025 दरम्यान रोज रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत Zoom मीटिंगद्वारे आयोजित केला जाणार आहे. 🕊️ कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट: आत्मजागृती: स्वतःच्या अंतरात्म्याशी नाळ जोडणारा आणि आत्मशक्ती वाढवणारा अभ्यास. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य: विचारांचे शुद्धीकरण आणि तणावमुक्त जीवनासाठी मार्गदर्शन. नशामुक्तीचा संदेश: व्यसनमुक्तीच्या दिशेने सकारात्मक वाटचाल. डिजिटल डिटॉक्स: मोबाइल-इंटरनेटच्या आहारी न जाता अंतर्मनाशी नाते जोडणारा प्रयत्न. योगाभ्यास: मनोबल वाढवणारे, स्थिरता देणारे राजयोगाचे अभ्यासक्रम. 🧑‍💻 सहभागी होण्यासाठी: ही कार्यशाळा नि:शुल्क असून, ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. ✅ इच्छुकांनी आपली माहिती खालील लिंकवर भरावी: 👉 रेजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 📱 9209188938 / 82753...

श्री. योगेश जी टावरी — कोंढाळीच्या कर्तृत्वशील व्यक्तिमत्वाला जय श्रीराम!

आजचा दिवस खास आहे... कारण आज आहे कोंढाळीतील एक प्रखर, दूरदृष्टी असलेलं आणि आदर्शवत व्यक्तिमत्त्व वडिलांच्या  पावलावर पाऊल टाकून चालणारे  श्री. योगेश जी टावरी यांचा वाढदिवस! व्यवसायिक क्षेत्रात आपल्या कष्ट, निष्ठा आणि पारदर्शक व्यवहारामुळे त्यांनी जो विश्वास निर्माण केला आहे, तो केवळ प्रेरणादायी आहे. कोंढाळी गावातच नव्हे, तर आसपासच्या भागातही "योगेश टावरी" हे नाव म्हणजे विश्वास, सचोटी आणि गुणवत्तेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. व्यवसायात यशस्वी असतानाही, समाजकार्याची जाण आणि माणुसकीची ओढ त्यांनी कायम जपली. अनेक सामाजिक उपक्रमांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. गोरगरीबांच्या मदतीपासून तर तरुण पिढीच्या मार्गदर्शनापर्यंत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, भरभराट आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो. 🌟 " माणूस मोठा तो मनाने, कार्याने आणि कृतज्ञतेने!" योगेशजी हे या प्रत्येक शब्दाला साजेसं व्यक्तिमत्त्व आहेत. मनाच्या गाभाऱ्यात एक नाव घर करतं,   योगेश जी टावरी  म्हणताच विश्वास उमटतं। कष्टाच्या ...