भूमिपूजन समारंभ संपन्न : मंगरुळनाथ नगर परिषदेत दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या सिमेंटकरणासाठी प्रारंभ

मध्ये दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम -सिमेंट रस्त्यांच्या भूमिपूजनाने विकासाच्या नव्या वाटा खुल्या !"



मंगरुळनाथ (सुनील भाऊ मालपाणी) – जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत नागरी दलितेत्तर योजना अन्वये मंगरुळनाथ नगर परिषदेच्या प्रभाग क्र. ९ मध्ये सिमेंट रस्त्यांच्या दोन कामांचा भूमिपूजन समारंभ दिनांक २९ जून रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या योजनेअंतर्गत पुढील कामे हाती घेण्यात आली आहेत:

  1. प्रभाग क्रमांक ९:
    यशवंतराव चव्हाण महाविद्यालयापासून ते वरुड रस्त्यापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम
    अंदाजित खर्च – ₹१,२५,००,०००/-

  2. प्रभाग क्रमांक ९:
    यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलापासून ते श्री. सुनील लांडगे यांच्या मोटार गॅरेजपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम
    अंदाजित खर्च – ₹३०,००,०००/-

या दोनही विकासकामांचा भूमिपूजन सोहळा वाशिम-मंगरूळनाथ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. श्याम रामचरणजी खोडे यांच्या शुभहस्ते पार पडला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष :

मा. श्री. चंद्रकांतदादा सुभाषरावजी ठाकरे
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम


प्रमुख उपस्थिती :

  • मा. श्री. पुरुषोत्तम चितलांगे, जिल्हाध्यक्ष, भाजपा, जिल्हा वाशिम
  • मा. श्री. सुरेश लुंगे, मा. जिल्हाध्यक्ष, भाजपा व मा. सभापती, जि.प. वाशिम
  • मा. श्री. चंदूभाऊ परळीकर, मा. नगराध्यक्ष, न.प. मंगरुळनाथ
  • मा. श्री. अशोकभाऊ परळीकर, माजी नगराध्यक्ष, न.प. मंगरुळनाथ

विशेष उपस्थिती :

अभिषेक दंडे (शहर अध्यक्ष), रविंद्र ठाकरे (तालुका अध्यक्ष), सुनील मालपाणी, वीरेंद्रसिंह ठाकुर सर, भास्कर पाटील शेगीकर, डॉ. दिलीप रत्नपारखी, सतीश हिवरकर, अनिल गावंडे, सतीश राठी, संजय खिराडे, युवराज पवार, सुमित मुंधरे, महेश टांक, सागर गुल्हाने आदींसह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मंगरुळनाथ नगर परिषद आणि संबंधित विभागांनी केले. स्थानिक नागरिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्यांना आता मूर्त स्वरूप प्राप्त होणार असून, या सिमेंट रस्त्यांमुळे परिसरात दळणवळण अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


✍️ बातमीसाठी संपर्क:
प्रतिनिधी, मंगरुळनाथ



Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू