बजरंग दलाच्या तत्परतेने तीन निरपराध जीव वाचले! गोवंश तस्करीचा पर्दाफाश —


प्रशासनाची उदासीनता गंभीर; गुन्हेगार मोकाट, कायदा कुठे झोपलाय?


मंगरूळनाथ (प्रतिनिधी):
तालुक्यातील गोवंश तस्करीचा व्यवसाय दिवसेंदिवस बळावतो आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे तस्करांचे फावले असून, काल रात्री उशिरा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर कारवाई करून एक गाय आणि दोन गोऱ्यांचे प्राण वाचवले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ही घटना मंगरूळनाथ तालुक्यातील एका आडरस्त्यावर घडली. संशयास्पद वाहनाची माहिती मिळताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ पाठलाग करून ते थांबवले. वाहनाच्या झडतीत एक जिवंत गाय व दोन गोऱ्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याचे आढळले. ही कारवाई झाल्यानंतर तस्कर अंधारात पसार झाले. घटनास्थळी स्थानिक पोलिसांना बोलावण्यात आले असून चौकशी सुरु आहे.

🗣️ "हा फक्त एक नमुना आहे; तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोवंश कत्तल व गोमांस निर्यातीचा काळाबाजार चालतोय. प्रशासनाला वारंवार सूचना करूनही काहीच ठोस उपाय योजना होत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे."
– सतीशभाऊ हिवरकर, तालुका प्रमुख, बजरंग दल

या प्रकरणावरून स्पष्ट होते की, मंगरूळनाथ व आसपासच्या परिसरात अवैध गोवंश वाहतूक व कत्तल व्यवसाय जोमात सुरू आहे. यामागे स्थानिक राजकीय वरदहस्त असल्याचीही कुजबुज आहे. अनेकदा तक्रारी करूनही कारवाई न झाल्यामुळे सामान्य नागरिक व सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे.

प्रशासन गाढ झोपलेलं — कायद्याचा धाकच राहिलेला नाही?
सततच्या तक्रारी, निवेदने, पत्रकार परिषदांनंतरही स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष ही गंभीर शंका निर्माण करते. गुन्हेगार खुलेआम व्यवसाय करत असताना पोलिस व महसूल विभाग शांत का आहे, हा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

जनतेची मागणी:
– या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी
– दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी
– मंगरूळनाथ तालुक्यातील गोवंश वाहतूक, लवकरात लवकर  थांबवण्यात यावी

Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू