विदर्भ लोककलावंत संघटना आणि पत्रकार संघाकडून स्व. उमेश कडोळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
“प्रामाणिक, हसतमुख, हरहुन्नरी कलाकार गमावला!”
📌 खासदार संजयजी देशमुख, आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना
कारंजा (लाड) : कारंजा येथील गोंधळी समाजाचे हरहुन्नरी कलाकार, उत्कृष्ट संबळवादक व डफवादक आणि अकोला जिल्हा सत्र न्यायालयात लिपीक पदावर कार्यरत असलेले स्व. उमेश मधुकरराव कडोळे यांचे अलीकडे दुःखद निधन झाले.
ते कारंज्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचे लहान बंधू होते. प्रामाणिक, हजरजबाबी, हास्यमुख, सुस्वभावी व सर्वांशी आपुलकीने वागणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. नोकरीपूर्वी त्यांनी आपल्या गोंधळी कलेच्या संवर्धनासाठी अथक परिश्रम घेतले. नवरात्र उत्सव आणि लग्नप्रसंगी त्यांना विशेष आमंत्रित केले जात असे. त्यांनी श्री कामक्षा मातेच्या आरत्यांसह शेकडो गोंधळी गीतांची रचना केली होती, जी आजही विविध गोंधळजागर कार्यक्रमांमध्ये गायिली जातात.
नोकरीनिमित्त अकोला येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांना असाध्य आजाराने ग्रासले आणि अचानक उपचाऱादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयोवृद्ध आईला पुत्रशोक व बंधूंना अपूरा झालेला भाऊ गमवण्याची वेदना यामुळे संपूर्ण कारंजा शहरात शोककळा पसरली. काही अडचणींमुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार अकोलातच करण्यात आले.
🌹 मान्यवरांचे शोकसंवेदना 🌹
🟠 खासदार संजयभाऊ देशमुख यांनी स्वतःचे सचिवामार्फत संजय कडोळे यांच्याशी संपर्क साधून सांत्वन केले.
🟠 शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक, प्राचार्य डॉ. के.बी. देशमुख यांनीही शोक व्यक्त केला.
🤝 प्रत्यक्ष भेटून दिलासा देणारे मान्यवर :
विदर्भ लोककलावंत संघटना, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार परिषद, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद, श्रमिक पत्रकार संघ यांच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या आई व भावाला धीर दिला.
त्यात प्रमुख उपस्थित:
- शाहीर देवमनराव मोरे
- पत्रकार विजय तेलगोटे, संजय तेलगोटे
- प्रदीप वानखडे, गजानन चव्हाण
- ह.भ.प. माणिक महाराज हांडे (पाटील)
- प्रा. अशोकराव उपाध्ये, विजय खंडार, बाळकृष्ण काळे, उमेश अनासाने इत्यादी.
🕊️ श्रद्धांजली व्यक्त करणारे अन्य मान्यवर:
- मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोलजी पाटणकर
- तहसीलदार कुणाल झाल्टे, समाजकल्याणचे दिनेश लहाडके
- नाट्य परिषद मुंबईचे नंदकिशोर कव्हळकर
- चित्रपट निर्माते-दिग्दर्शक डॉ. इम्तियाज लुलानिया, डॉ. मुजफ्फर खान, डॉ. कुंदन श्यामसुंदर
- माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, विजय बगडे
- गुरुदेव सेवा मंडळाचे ह.भ.प. लोमेश पाटील चौधरी
- लोकमत स्तंभलेखक प्रा. प्रज्ञानंद थोरात, पत्रकार गुलाब ठाकरे, गजानन काटे
- दिनेश बाबू वाघमारे (मदत संस्था, नागपूर)
- शेषराव मेश्राम (परिवर्तन कला मंच)
- संदीप पिंपळकर (वॉईस ऑफ मीडिया)
- पत्रकार गणेश लहाने, किरण क्षार, विनोद गणवीर, आरिफ पोपटे, हफिजखान
- स्त्रीशक्ती मंच अध्यक्षा सौ. शारदा भुयार, सौ. वैशाली चवरे, सौ. कृपाताई ठाकरे आदींनी फोन, संदेश, प्रत्यक्ष भेटीतून श्रद्धांजली अर्पण केली.
ही माहिती विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे सचिव विजय पाटील खंडार यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
🕯️ त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏
Comments
Post a Comment