गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने प्री-प्रायमरी स्कूलला शैक्षणिक भेट
मंगरूळपीर,
(सुधाकर चौधरी) –
श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा संचलित यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यार्थिनींनी मंगळवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी येथील वाय.सी.सी.बी.एस.सी. प्री-प्रायमरी स्कूलला शैक्षणिक भेट दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव कुमार होते. प्रमुख अतिथी म्हणून कोमल मॅडम व वैशाली मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सुषमा एस. जाजू होते.
यावेळी बी.ए. तृतीय वर्षाच्या १५ विद्यार्थिनींनी भाग घेतला. शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसोबत प्लेथेरपीच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. खेळण्यांच्या सहाय्याने शिक्षण देताना एकवचन-बहुवचन, विरुद्धार्थी शब्द, झाडाचे भाग, मराठी महिने, आठवड्याचे वार, कवितेतील रायमिंग शब्द, वाक्यांचे प्रकार आदी विषय चार्ट्स व कृतीतून समजावून सांगण्यात आले.
ही शैक्षणिक भेट संस्थेचे सचिव चंद्रकांतदादा ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य डॉ. कान्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
विद्यार्थिनींमध्ये शिवानी मोरे, भक्ती सुर्वे, साक्षी
Comments
Post a Comment