मतदारसंघाचा संपूर्ण विकास हेच बहूजन मुक्ती पार्टीचे खुले धोरण - संजय ढळे


सुधाकर चौधरी वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक

वाशिम - राज्यात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून या निवडणूकीत महापुरुषांच्या विचारधारेवर कार्य करणारी बहूजन मुक्ती पार्टी आपल्या संपूर्ण ताकदीनिशी उभी राहीली आहे. तसेच ५०० रुपयाच्या स्टॅम्पवर विकासाचे धोरण लिहून देणारी बहूजन मुक्ती पार्टी हा एकमेव पक्ष असून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत अशी ग्वाही वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघात खाट या चिन्हावर उभे असलेले बहूजन मुक्ती पार्टीचे उमेदवार संजय सखाराम ढळे यांनी पत्रपरिषदेत दिली.
निवडणूकीच्या अनुषंगाने मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी अकोला हायवेवरील हॉटेल अ‍ॅम्बेसेडरच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेला उमेदवार संजय ढवळे यांच्यासह पदाधिकारी बहूजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय सचिव सौरभ गायकवाड, डॉ. रवि जाधव, जिल्हाध्यक्ष आदेश गवई, युवा जिल्हाध्यक्ष शाम खिल्लारे, धम्मदास वाकोडे, उल्हास सावके, मंगेश कांबळे, गायकवाड सावंगा, गजानन गवई उपस्थित होते. यावेळी संजय ढळे यांनी पक्षाचा जाहीरनामा वाचून दाखविला. सौरभ गायकवाड म्हणाले की, या विधानसभा निवडणूकीत बहुजन मुक्ती पार्टी राज्यात एकूण ५५ जागा लढवत असून ५०० रुपयाच्या स्टॅम्पवर वचननामा लिहून देणारी बहूजन मुक्ती पार्टी ही भारतातील एकमेव पार्टी आहे. पार्टीने लोकहिताचा व विकासाचा मुद्दा समोर ठेवून शैक्षणिक धोरण, कृषी धोरण, आरक्षण धोरण, आरोग्य धोरण, अत्याचार प्रतिबंधक धोरण, खाजगीकरण धोरण आखले आहे. या धोरणात युवा बेरोजगार, मजूर, कास्तकार, शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, विद्यार्थिनी, डॉक्टर, वकील, पत्रकार, इंजिनियर यासह सर्व घटकांच्या विकासासाठी बहूजन मुक्ती पार्टीचे सर्व उमेदवार वचनबद्ध आहेत. राज्यात आमचे लोकप्रतिनिधी निवडून दिल्यास आम्ही या सर्व गोष्टींवर काम करुन राज्याचा भरीव विकास करु असे आश्वासन संजय ढळे यांनी दिले. पक्कं

Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू