उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार";
विधानसभा निवडणुकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने मोठी तयारी केली असून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाच्या बैठका सुरू असल्याचा मोठा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
"याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना मुस्लिम समाज त्यांच्याकडून आश्वासन घ्यायला सांगत आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशा पद्धतीने त्यांना आश्वासन देत आहे हे पाहणे महत्वाचे आहे, असंही आंबेडकर म्हणाले.
वंचितची पाचवी यादी जाहीर
:प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने यंदा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. वंचित आघाडीकडून आज आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून वंचितने आज १६ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली.
वंचितकडून पाचव्या यादीत कोणाकोणाला संधी? १. भुसावळ - जगन देवराम सोनवणे२. मेहकर - डॉ. ऋतुजा चव्हाण३. मूर्तिजापूर - सुगत वाघमारे ४. रिसोड - प्रशांत सुधीर गोळे५. ओवळा माजिवडा- लोभर्सिग गणपतराव राठोड६. ऐरोली - विक्रांत दयानंद चिकणे७. जोगेश्वरी पूर्व - परमेश्वर रणशुर ८. दिंडोशी - राजेंद्र तानाजी ससाणे ९. मालाड - अजय आत्माराम रोकडे १०. अंधेरी पूर्व - अॅड. संजीवकुमार कलकोरी११. घाटकोपर पश्चिम - सागर रमेश गवई १२. घाटकोपर पूर्व - सुनिता मायकवाड१३. चेंबूर - आनंद भीमराव जाधव १४. बारामती- मंगलदास तुकाराम निकाळजे १५. श्रीगोंदा - अण्णासाहेब शेलार १६. उदगीर - प्रा. डॉ. शिवाजीराव मरेप्पा देवनाळे
Comments
Post a Comment