इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना रोटरी संस्थेतर्फे दिवाळी गिफ्ट
रोटरी ही एक सामाजिक संस्था असून रोटरी संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्न करत असतात. यामध्ये शाळा दत्तक घेणे, डिजिटल स्कूल, ई लर्निंग किट, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, वर्गातील बेंचेस, फर्निचर, वह्या पुस्तके यासारखे उपक्रम वर्षभर राबवीत असतात. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून रोटरी क्लब ऑफ निगडी चे अध्यक्ष श्री. सुहास ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या तर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲप मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्ष हे आयुष्याला वळण देणारे वर्ष असल्याने पालक व शिक्षक यांची देखील मुलांकडून उत्तम गुणांची अपेक्षा असते. दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सहज सोप्या भाषेत समजून घेता यावा व अभ्यासात तज्ञ शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी रोटरी क्लब ऑफ निगडी यांनी गुणवत्ता पूर्ण व दर्जेदार असणारे आयडियल स्टडी ॲप 2000 विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमा अंतर्गत व्हि. के माटे हायस्कूल चिंचवड, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय थेरगाव, लक्ष्मीबाई धाईंजे विद्यालय, एम. एम. विद्यालय काळेवाडी, प्रेरणा माध्यमिक विद्यालय प्राधिकरण, ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय रुपीनगर, राजा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय तळवडे, ज्ञानदा प्रशाला, अभिमान महाविद्यालय प्राधिकरण या शाळांमध्ये हा उपक्रम करण्यात आला.
Comments
Post a Comment