गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत सेमिनार संपन्नमंगरूळपीर-

स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत अभ्यासक्रमावर आधारित विविध विषयांवर विद्यार्थिनींनी  द्वारे सेमिनार प्रेसेंटेशन दिनांक 21ऑक्टोंबर ते 26 ऑक्टोबर 2024 या कालावधीत केले.
                 
गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ समन्वयक प्रा. सौ .सुषमा जाजु, अध्यक्ष प्रा. एन.पी .पडवाल राज्यशास्त्र विभाग प्रमुख  हे उपस्थित होते. समन्वयक प्रा. सुषमा जाजू यांनी विद्यार्थिनींमध्ये असलेल्या अध्यापन कौशल्याला वाव देण्याकरिता तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ,नवीन तंत्रज्ञानाचे महत्त्व ही जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महाविद्यालयांमध्ये राबविले जातात असे मत प्रतिपादन केले. तसेच अध्यक्ष प्रा. पडवाल  यांनी सेमिनार प्रेझेंटेशन चे काही टिप्स विद्यार्थ्यांना सांगितले व त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता अशा प्रकारचे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबविले जाते, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास ,संवाद कौशल्य ,भाषा कौशल्य निर्माण होण्यास मदत होते असे मत प्रतिपादन केले.
               बी.ए .भाग 3 चे अश्विनी फड ,  प्रणाली भोयर, रेखा भगत,  भावना खंडारे, चैताली महल्ले,
    तसेच बी.ए .भाग 2 चे गौरी ठाकूर ,शिवानी मोरे, भक्ती सुर्वे ,आचल चव्हाण, चैताली पाकधने, कल्याणी पाकधने , लाजरी मिटकरी अश्विनी लहाने, साक्षी भगत , अनामिका इंगोले, प्रज्ञा भगत, वृषाली ठोंबरे, निकिता भगत इत्यादी विद्यार्थिनींनी सेमिनार प्रेझेंट केले.
               
                या उपक्रमाला महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे सचिव चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन  प्रा. सौ.सुषमा जाजु यांनी हे उपक्रम राबविले. यात जवळपास 25 विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला , तसेच बी.ए. भाग 2 व 3 चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते व उपक्रम यशस्वी संपन्न झाले.
           गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ
                 य. च. कला व विज्ञान                   महाविद्यालय मंगरूळपीर ,जिल्हा वाशिम

Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू