छाननी प्रक्रियेत १२ उमेदवार बाद; निवडणूक आखाड्यात उरले ९९!

तिन्ही मतदारसंघांमध्ये 'टफ फाइट'चे संकेत!जिल्ह्यातील वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे श्याम खोडे आणि उद्भवसेनेचे डॉ. सिद्धार्थ देवळे, कारंजात भाजपच्या सई डहाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्ञायक पाटणी यांच्यात थेट लढत होणार असून दोन्ही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसह अन्य राजकीय पक्ष व काही अपक्षांनी मोठे आव्हान उभे केल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रिसोड मतदारसंघात काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमीत झनक, शिंदेसेनेच्या भावना गवळी आणि अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख अशी तिहेरी लढत होण्याचे संकेत

वाशिम : आगामी विधानसभा
निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर या अंतिम मुदतीपर्यंत १११ उमेदवारांकडून १३६ अर्ज दाखल करण्यात आले होते. ३० ऑक्टोबरला छाननी प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात १२ उमेदवारांच्या अर्जात त्रुटी निघाल्याने त्यांना बाद ठरविण्यात आले असून, आता निवडणुकीच्या मैदानात ९९ उमेदवार उरले आहेत. ४ नोव्हेंबरपर्यंत नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यात किती जण माघार घेतात आणि प्रत्यक्ष किती उमेदवार रिंगणात शिल्लक राहतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होऊ घातली आहे. दरम्यान, वाशिम मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांसह अन्य पक्ष व अपक्ष अशा एकूण ४१ जणांनी ४२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ३० ऑक्टोबरला पार पडलेल्या छानणी प्रक्रियेमध्ये ४ उमेदवारांचे ४ अर्ज बाद ठरले असून, ३७ उमेदवारांचे अर्ज कायम आहेत.
रिसोड मतदारसंघात अंतीम मुदतीपर्यंत २० जणांनी ३३ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १ उमेदवार आणि ५ अर्ज बाद ठरविण्यात आले १९ उमेदवारांचे २८ अर्ज कायम आहेत; तर कारंजा विधानसभा मतदारसंघात ५० जणांनी उमेदवारी दाखल केली असून त्यातील ७ जणांच्या अर्जात तुटी निघाल्याने त्यांना बाद ठरविण्यात आले; तर ४३ उमेदवारांचे अर्ज स्विकृत करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.

Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू