ओंकार राख यांचा शिवसेनेत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश



युवासेनेला संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवण्याचं स्वप्न बाळगत ओंकार राख यांनी केला जाहीर प्रवेश

बीड  (प्रतिनिधी):
 महाराष्ट्राची आण बाण आणि शान असलेला पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या शिवसेना पक्षात महाराष्ट्रातील युवकांमध्ये प्रसिद्ध असलेले नेतृत्व ओंकार राख यांनी युवासेना प्रमूख आदित्यजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्यासह शिवसेनेचे अनिकेत  शिंदे,किशोर घुले, सागर जाधव,अमोल घुले, संदिप तांदळे सह शिवसैनिक उपस्थित होते.
विधानसभा जाहीर होताच हा झालेला प्रवेश पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवून होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा फायदा होणार आहे.

—————————
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा मावळा ओंकार भैय्या राख नक्कीच येणाऱ्या विधानसभेत पक्ष वाढीची भूमिका घेतील. बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली सह रायगड, पुणे येथील युवकांसोबत सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव तसेच संपर्क असेलेल नेतृत्व येणाऱ्या काळात पक्षावाढीसाठी प्रयत्नशील असेल.


Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू