मोहोळ परिवाराचा आगळावेगळा वाढदिवस साजरा : गरजू दिव्यांग परिवाराला दिला मदतीचा हात



काजळेश्वर, 
वाढदिवस म्हटला की केक, फटाके, पार्टी, सेल्फी आणि जल्लोष! पण मोहोळ कुटुंबीयांनी यावर्षी आपल्या परंपरेला छेद देत एक आगळावेगळा, समाजाभिमुख उपक्रम राबवला. पृथ्वी विश्वजीत मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त काजळेश्वर येथे एक शंभर टक्के गरजू, दिव्यांग असलेल्या अनुसया गिरी या कुटुंबाला किराणा किट आणि अन्नधान्य देऊन मदतीचा हात दिला.

सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला. या मदतीमागील हेतू फक्त एकच — ज्या कुटुंबांकडून आज कोणतेही काम होत नाही, जे खऱ्या अर्थाने जीवनाच्या संघर्षात आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे.

"वाढदिवस साजरा करताना फुगे, फटाके, केक यावर हजारो रुपये खर्च करतो. पण याच पैशातून एखाद्याच्या पोटात अन्न जाऊ शकतं, एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलू शकतं, तर तो खरा आनंद नाही का?" — असा प्रश्न श्रमिक पत्रकार संघाच्या महिला संघटक पद्मा मोहोळ व परिवारातील सदस्यांनी उपस्थित करत समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

समाजात सकारात्मक बदल घडवण्याची भावना, मदतीचा खरा उद्देश आणि दिलदारपणाची सुंदर शिकवण देणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मोहोळ कुटुंबीयांचा हा आगळावेगळा वाढदिवस समाजातील इतरांनाही प्रेरणा देणारा ठरेल, यात शंका नाही.


Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू