श्याम खोडे यांनी चेहेल येथील नवशा गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन नारळ फोडून केला प्रचाराचा शुभारंभ !


 

मंगरूळपीर - दि. ६ - वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्याम भाऊ खोडे यांनी चेहेल येथील  जागृत संस्थान असलेले नवशा गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊन व नारळ फोडून  प्रचाराचा शुभारंभ करत प्रचाराचे रणशिंग फुंकले. या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित मान्यवर व महिलांनी श्याम भाऊ खोड यांचे औक्षण करून त्यांचे मोठ्या मनाने स्वागत केले. त्यानंतर  नागरिकांच्या समस्यांना जाणून घेत पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्याम भाऊ खोडे यांनी नागरिकांशी संवाद साधत, नागरिकांच्या भेटीगाठी केल्या. त्याच बरोबर त्यांनी  परिसरातील राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. 

  प्रचारा दरम्यान नागरिकांनी आणि महिला भगिनींनी श्याम भाऊ खोडे यांचे  जंगी स्वागत केले. त्यानंतर मतदारांच्या घरी जावून प्रत्यक्ष भेटी गाठी घेवून सुसंवाद साधला. दरम्यान स्वतः लोकांनी प्रचारात सहभागी होऊन व्यथा मांडल्या त्या नक्कीच आपण सोडवून घेवू असा शब्द श्याम भाऊ खोडे , डॉक्टर रत्नपारखी , सुनील भाऊ मालपाणी, यांनी ग्वाही दिली लोकांनी माझी कार्य करण्याची क्षमता आणि पार्श्वभूमी पाहून मतदान करावे आणि नक्कीच लोकं माझ्या पाठीशी उभे आहेत. केवळ विकासाचा दिखाऊ पणा करून चालणार नाही. प्रत्यक्ष काम झाले पाहिजे. अशा शब्दात पंचक्रोशीतील जनसामान्यांना शब्द दिला हा मुख्य उद्देश पूर्ण करीन व आपली अविरत सेवा करीन आपला सर्वांचा विकास हाच माझा ध्यास
प्रचारांमध्ये चांगलीच आघाडी घेतली असून, आमदार म्हणून निवडून देण्याचा विश्वास ठिकठिकाणी मतदारांकडून देण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या गावभेटीमध्ये तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा खोडे यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने इतरांच्या तंबूत घबराट सुटली आहे 

Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू