प्रा.डॉ.प्रमोद तायडे संत गाडगेबाबा विद्यापीठातर्फे उत्कृष्ट रासेयो कार्यक्रमाधिकारी पुरस्काराने सन्मानित


मंगरूळपीर : स्थानिक श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरूळपीर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रमोद रामकृष्ण तायडे  यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट रासेयो कार्यक्रमाधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. मा.डॉ. मिलिंद बारहाते कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या  व मा.डॉ.निलेश कडू संचालक रासेयो, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या प्रमुख मार्गदर्शनातील निवड समितीने  प्रा.डॉ.प्रमोद तायडे यांची विद्यापीठाच्या वतीने उत्कृष्ट रासेयो  कार्यक्रमाधिकारी वाशिम जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या आदी विद्यापीठाद्वारे क्रॉस कंट्री मैनगलोर विद्यापीठ कर्नाटक येथे राष्ट्रीय स्तरावर  व राज्यस्तरावर प्रेरणा शिबिर  नागपूर आणि सहाशी  शिबीर चिखलदरा या राज्यस्तरीय शिबिरामध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. आणि  राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक या राष्ट्रीय स्तरावर  चमू व्यवस्थापक म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांच्या अशा बहुविध कार्याची दखल घेऊन त्यांचा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ.अविनाश असनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व रासेयो संचालक डॉ. निलेश कडू यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अ.राठोड साहेब संस्थेचे सचिव डॉ. अश्विन कुमार नाईक व मानद व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी डॉ.एल.के.करागळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.वडगुले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा. डॉ.प्रमोद तायडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू