गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाची नूतन कार्यकारिणी गठन -
मंगरूळपीर-स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सत्र 2024-25 या वार्षिक सत्रा करिता नूतन कार्यकारिणी दिनांक-14/10/2024 सोमवार रोजी गठीत करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा.एस.एस. जाजू यांनी आयोजन केले व प्रास्ताविकामध्ये यांनी गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत घेण्यात आलेले व घेतले जाणारे विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यामध्ये अध्यक्षपदी बी.ए. भाग ३ चे प्रणाली भोयर तर सचिव पदी अश्विनी फड, उपाध्यक्ष गौरी ठाकूर, सहसचिव गायत्री बुरे, कोषाध्यक्ष अश्विनी लहाने, सहकोषाध्यक्ष स्वाती भगत ,सल्लागार भावना खंडारे ,सहसल्लागार शिवानी मोरे ,प्रसिद्धी प्रमुख भक्ती सुर्वे, सह प्रसिद्धी प्रमुख मुक्ता जाधव तर सदस्य पदी साक्षी भगत ,चैताली पाकधने, ,आचल चव्हाण , कल्याणी पाकधने , चैताली महल्ले, वैष्णवी महल्ले, वैष्णवी सुर्वे, वेदिका भालेराव, भूमिका भगत, सानिका खिराडे, वैष्णवी ठाकरे, धनश्री वरगट ,योगिता मोहोळे, पूनम शिरसाट ,साक्षी पवार, प्रणाली इंगोले यांची निवड करण्यात आली. सर्व पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच प्रा.जाजू मॅडम यांनी कार्यकारिणी घोषित केली आणि नवनिर्वाचित अध्यक्ष प्रणाली भोयर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाचे संचालन प्रीती राऊत यांनी तर आभार निकिता भगत यांनी मानलेत व महाविद्यालयातील 50 विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment