राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लोणावळा उपखंड वतीने विजयादशमी दिनी पथसंचलन आयोजित
लोणावळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लोणावळा उपखंड वतीने विजयादशमी दिनी लोणावळा शहरात सघोष पथसंचलन आयोजित करण्यात आले. संघ दृष्ट्या लोणावळा तालुक्यातील लोणावळा उपखंड मध्ये पूर्ण गणवेशात स्वयंसेवकांचे हे शिस्तबद्ध संचलन झाले.
दरम्यान संचलन सुरू होण्याआधी प्रथेप्रमाणे राममंदिर भांगरवाडी प्रांगणात भगव्या ध्वजाचे पूजन करून सघोष मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शहराच्या बाजारपेठेतून संचलनाचे स्वागत नागरिकांनी पुष्पवृष्टी करून केले. यावर्षी संचलनाचा समारोप राममंदिर गवळीवाडा येथे करणात आला.
विजयादशमीच्याच दिवशी नागपुरातील मोहिते वाड्यात 1925 मध्ये संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे दरवर्षी विजयादशमीला संघाचे स्वयंसेवक देशभरात पथसंचलनांचे आयोजन केले जाते . यंदा संघ शताब्दी वर्षात प्रवेश करत असल्याने पथसंचलनांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
घोषाच्या वादनात शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणारे हे संचलन केवळ स्वयंसेवकांमध्ये नाही तर नागरिकांमध्येही राष्ट्रभक्तीची भावना जागृत करते.
नुकतेच मागील रविवारी (६ ऑक्टोबर) श्री रविंद्र वझे, डायरेक्टर, रेको ट्रान्सफॉमर कंपनी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शस्त्रपूजनाचा उत्सवही झाला. त्यावेळी पुणे विभाग प्रचारक श्री. मंगशजी बडवे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
संघाच्या सहा उत्सवांपैकी विजयादशमी एक प्रमूख उत्सव आहे. याच दिवशी नागपूरात होणारे माननीय सरसंघचालकांचे उद्भोदन संघाच्या आगामी वाटचालीची आणि स्वयंसेवकांच्या कार्याची दिशा स्पष्ट करते.
Comments
Post a Comment