सर न्याय धीशांचा ऐतिहासिक निर्णय!कोर्टातील न्यादेवतेच्या हाती तलवारीच्या जागी संविधान, डोळ्यावरील पट्टीही हटवली



वाशीम : भारतीय न्यायदेवतेचा चेहरामोहारा बदललाय. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यायदेवतेच्या हाती संविधानाची प्रत देण्यात आली आहे. त्यामुळे एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान असं नवं रुप न्यायदेवतेला देण्यात आलं आहे. ब्रिटीशांच्या काळात भारतीय न्यायव्यवस्थेतील बहुतांश कायदे रोमन संस्कृतीतील प्रतीकांच्या आधारे तयार करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून डोळ्यावर पट्टी आणि हातात तराजू आणि तलवार असणारी रोमन पोशाखातील न्याय देवता 'लेडी जस्टिशिया'ची मूर्ती भारताची न्यायादेवता म्हणून स्विकारण्यात आली. आज सरन्यायधीश धनजंय चंद्रचूड यांनी या न्यायदेवतेचा चेहरा मोहोराच पालटून टाकलाय. नवी न्यायदेवता भारतीय पोषखात आहे. तिच्या गळ्यामध्ये भारतीय दागिने आहेत. तिची केशभूषा देखील भारतीय करण्यात आली आहे. शिवाय न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढून टाकण्यात आली आहे. या निर्णयातून 'अंधा कानून' नाही, हा संदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.कसा झाला बदल?
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांनी याबाबतचे निर्देश दिले आहे. नव्या रुपातील पुतळा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या ग्रंथालयात उभारण्यात आला आहे. यापूर्वी न्यायदेवतेचे दोन्ही डोळ्यांवर पट्टी होती. तसंच एका हातामध्ये तराजू आणि दुसऱ्या हातामध्ये शिक्षा देण्याचं प्रतीक म्हणून तलवार होती. का घेतला निर्णय?
CJI कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण इंग्रजांच्या वारश्यातून पुढं गेलं पाहिजे, असं मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांचं मत आहे. ते सर्वांना समान लेखतात. त्यामुळे न्यायदेवतेचे स्वरुप बदलण्यात यावं. देवीच्या हातामध्ये तलवार नाही तर संविधान हवं. त्यामुळे समाजात संविधानाच्या हवाल्यानं न्याय दिला देण्यात येतो 
CJI चंद्रचूड यांचा असा विश्वास होता की इंग्रजांचा वारसा सोडून आता पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच आंधळा नसतो. तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे सरन्यायाधीशांचे मत होते. देवीच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल.

 

Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू