गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळा अंतर्गत गटचर्चेचे आयोजन संपन्न-
मंगरूळपीर-
मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ कासोळा द्वारा संचालित स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात ,गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे .अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून *रोजगार आणि स्वयंरोजगाराकरिता गृहअर्थशास्त्र विषयाच्या ज्ञानाचा उपयोग
या विषयावर गटचर्चा दिनांक 15/10/2023 मंगळवार रोजी संपन्न झाली.
गटचर्चाचे समन्वयक प्रा. सौ. एस. एस. जाजू तसेच मंडळाचे अध्यक्ष प्रणाली भोयर , उपाध्यक्ष गौरी ठाकूर प्रमुख अतिथी म्हणून मंचकावर उपस्थित होते.
सर्वप्रथम समन्वयक प्रा. सो. एस. एस. जाजू यांनी गटचर्चेचे उद्दिष्टे आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले तसेच बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता घर आणि नोकरी असे दुहेरीक्षेत्र स्त्रियांच्या वाट्याला आलेले आहेत ,अशावेळी गृह अर्थशास्त्र विषयाचे शिक्षण विद्यार्थ्यांना व्यवहारिक, वैज्ञानिक, आर्थिक ,सामाजिक दृष्टिकोनातून दिल्यास या शिक्षणाच्या ज्ञानाचा उपयोग कुशल गृहिणीची क्षमता निर्माण करणे, स्वयंरोजगार किंवा रोजगार करण्याची पात्रता निर्माण करणे शक्य होते या विषयावर मार्गदर्शन केले आणि मंडळाचे अध्यक्ष प्रणाली भोयर , गौरी ठाकूर प्रमुख अतिथी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या गटाचर्चेमध्ये बी.ए .भाग 1,2 & 3 च्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात एकूण 6 गटाचे समावेश होते. चार-पाच मुलींचा एक गट तयार करण्यात आलेला होता. बी.ए. भाग 1 चे स्वाती भगत ,पूनम शिरसाट ,तृप्ती ठोंबे, मुक्ता जाधव, गायत्री बुरे ,नम्रता बुरे ,सानिका खिराडे ,भूमिका भगत, वैष्णवी सुर्वे, धनश्री वरगट,योगिता मोहोळ, साक्षी पवार, पूजा अंभोरे, कोमल राऊत, शितल राऊत बी.ए. भाग 2 चे साक्षी भगत, अश्विनी लहाने, गौरी ठाकूर, , भक्ती सुर्वे, शिवानी मोरे ,अनामिका इंगोले , चैताली पागधने ,कल्याणी पाकधने या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच बी.ए. भाग 3 चे अश्विनी फड, प्रणाली भोयर , भावना खंडारे, चैताली महल्ले, रेखा भगत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला इत्यादी विद्यार्थिनींनी गटचर्चा नाटकाच्या स्वरूपात तसेच मुलाखतीचे स्वरूपात तसेच व्याख्यानाच्या स्वरूपात प्रदर्शित केले.
गटचर्चेचे सूत्रसंचालन गायत्री बुरे व नम्रता बुरे यांनी तर आभार प्रदर्शन तृप्ती ठोंबे यांनी केले.
ही गटचर्चा संस्थेचे सचिव चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणे ने प्रेरित होऊन, प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांच्या मार्गदर्शनात ,गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे समन्वयक प्रा. सौ. एस .एस . जाजू यांनी आयोजित केली व यात 25 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला व 55 विद्यार्थी उपस्थित होते आणि गटचर्चा यशस्वी संपन्न झाली.
Comments
Post a Comment