लोकस्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन
वाशिम : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर कल्याणकारी महामंडळाकडून बांधकाम कामगारांना विविध योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतात. परंतू काही दलालांच्या लुडबुडीमुळे व कायमस्वरुपी सरकारी कामगार अधिकारी नसल्यामुळे अनेक कामगार लाभपासून वंचीत राहत असल्यामुळे लोकस्वराज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला दि. 10 ऑक्टोबर रोजी दु. 12 वाजतापासून सुरुवात केली आहे.
त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचे कामकाज हे पूर्णपणे नियमांना डावलून होत असून, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना गृहउपयोगी भांडी संच वाटप करण्यात येत आहेत. दलालमार्फत महामंडळाचे लाभ घेणार्या कामगारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. देण्यात येणार्या गृह उपयोगी संचाच्या किटमध्ये ठेकेदाराने वस्तु कमी दिल्या जात आहेत. महामंडळाचे कार्यालय हे मोक्याच्या ठिकाणी व सरकारी जागेत न देता राजकीय व आर्थिक हितसंबंधापोटी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरात भाडे तत्वावर स्थलांतरीत करण्यात आरोप करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment