पत्रकार आणि वृत्तपत्र महामंडळाचा मंत्री मंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून स्वातंत्र्य दोन असे आर्थिक विकासमहामंडळाचा निर्णय दिल्याबद्दल सर्वच मंत्रिमंडळाचे अभिनंदन - पत्रकार तथा वृत्तपत्र विक्रेता श्याम अपूर्वा

आनंदित राज्यातील सर्वच पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांनी शासन निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले.
अमलबजावणी त्वरित व्हावी.

शेलुबाजार वार्ता :⁠-  देशातले पहिले राज्य असून महाराष्ट्र शासनाने पत्रकारांसाठी स्वातंत्र आर्थिक विकास महामंडळ व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सुद्धा स्वतंत्र महामंडळची स्थापना करून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला पत्रकारांसोबत वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापना करणारे महाराष्ट्र राज्य एकमेव राज्य असून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशअध्यक्ष वसंतराव मुंडे व सरचिटणीस विश्वासराव आरोटे व मागणीमध्ये प्रमुख पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळची स्थापना करण्याची मागणी करण्यात आली होती ती मागणी मान्य झाल्याने दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई अशी हजारो पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते संवाद यात्रेला मोठे यश मिळाले आहे सदर मागणी करिता प्रदेश अध्यक्ष श्री वसंतराव मुंडे व विदर्भ अध्यक्ष श्री निलेश सोमानी यांनी गत तीन दिवसापासून मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विविध मंत्री गण यांची भेट घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी रेटून धरली असून महायुती सरकारने सदर मागणी मान्य करून पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांना न्याय दिला आहे.
 
या ऐतिहासिक निर्णयामुळे पत्रकार संघटनेच्यावतीने महाराष्ट्र राज्य सरकारचे आभार व्यक्त करून मुंबई येथे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमानी व युवा पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता श्याम अपूर्वा यांनी नामांकित द ॲम्बेसिडर हॉटेल मुंबई येथे पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेता या संघटनेच्या माध्यमातून तडफदार लोकप्रिय प्रदेशअध्यक्ष श्री वसंतराव मुंडे साहेब यांचे सत्कार करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

आरटीओ अधिकाऱ्यांची दादागिरी की कार्यपद्धती?शेख इरफान यांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग कडे धडक तक्रार

१४ वर्षे न्यायासाठी झिजल्या चपला; अखेर नगर परिषदेसमोर 'फाशी' आंदोलन!

लोकशाही टिकवण्यासाठी जागरूकतेचा महामार्ग… लोक आंदोलन न्यासाचा संघटन बांधणी दौरा सुरू